Uncategorized

Nashik Kumbh Mela :

कुंभमेळ्याच्या नावाखाली ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरांवर बुलडोझर; नाशिकचे चारही मंत्री बिळात लपल्याची महंतांची टीका

Nashik Kumbh Mela Land Dispute : कुंभमेळ्याच्या नावाखाली शेकडो शेतकऱ्यांना त्यांच्याच जमिनीतून बेदखल करण्यात आले आहे. यावर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व सत्ताधारी आमदार हातबल आहेत. यानिमित्ताने साधू आणि महंत मात्र शेतकऱ्यांच्या मदतीला धावलेत.

Nashik Kumbh Mela News, 23 Oct : कुंभमेळ्याच्या नावाखाली शेकडो शेतकऱ्यांना त्यांच्याच जमिनीतून बेदखल करण्यात आले आहे. यावर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व सत्ताधारी आमदार हातबल आहेत. यानिमित्ताने साधू आणि महंत मात्र शेतकऱ्यांच्या मदतीला धावलेत.

त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील 15 किलोमीटर परिसरात एनएमआरडीए चा बुलडोझर दिवाळीत शेतकऱ्यांच्या घरावर चालला. याबाबत जिल्ह्याचे नेतृत्व करणारे मंत्री गिरीश महाजन यांनी हात झटकले. त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय नेतृत्व कुठे आहे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या साधू-महंत आणि आखाड्यांसाठी कुंभमेळा होतो. तेच साधू आणि महंत शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आहे. त्यांनी ‘एनएमआरडीए’च्या जमीन ताब्यात घेण्याला विरोध केला आहे.

 

त्र्यंबकेश्वरचे साधू महंत शेतकऱ्यांच्या मदतीला धावले. श्री पंचायती आनंद आखाड्याचे प्रमुख महंत शंकरानंद महाराज यांनी ‘एनएमआरडीए’ला गंभीर इशारा दिला. साधू आणि कुंभमेळ्याच्या नावाखाली प्रशासन शेतकऱ्यांना उध्वस्त करीत आहे. हे आम्ही खपवून घेणार नाही

महंत शंकर आनंद महाराज यांनी राजकीय चांगलीच खरडपट्टी काढली. मते घेण्यासाठी राजकीय नेते शेतकऱ्यांकडे जातात. आज शेतकरी संकटात आहे यावेळी हे नेते आमदार कुठे हरवले आहेत? प्रश्न त्यांनी केला.

 

राज्यातील महायुती सरकारमध्ये नाशिकचे 4 मंत्री आहेत. हे सर्व मंत्री प्रभावशाली आहेत. आज शेतकऱ्यांवर अत्याचार होत असतानाही चार मंत्री कोणत्या बिळात लपून बसले आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला

.

यानिमित्ताने महायुती सरकारचा कारभार आणि त्यातील सत्ताधारी या सगळ्यांबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील सर्व आमदार सत्ताधारी आहेत. मात्र शासकीय निर्णय प्रक्रियेत त्यांना काही महत्त्व आहे की नाही? असा गंभीर प्रश्न निर्माण होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button